Thursday, July 23, 2026
Homeक्राईमShirdi : जमीन फसवणूक प्रकरणी खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Shirdi : जमीन फसवणूक प्रकरणी खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी

शिर्डीतील व्यवहारांचे धागेदोरे उलगडणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी परिसरात जमीन व्यवहार, खाजगी सावकारकी आणि मोठ्या आर्थिक गैरप्रकारामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेला भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. चार एकर जमीन खरेदी व्यवहारात मूळ मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी राहाता न्यायालयाने खरातला 9 मे पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक येथील विशेष तपास पथकाच्या कोठडीत असलेल्या खरातला शिर्डी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेऊन मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. या जमीन फसवणुकीसह त्याच्यावर खाजगी सावकारकीचाही गुन्हा दाखल असून, आता शिर्डी पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे प्रकरण केवळ जमिनीपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याशी जोडले गेल्याचा संशय आहे. समता पतसंस्था प्रकरणात सुमारे 56 जणांच्या नावाने 100 बनावट खाती उघडून 70 कोटी रुपयांची संशयास्पद उलाढाल केल्याचा ठपका खरातवर ठेवण्यात आला आहे. या धक्कादायक उलाढालीसोबतच शिर्डी विमानतळाजवळील जमिनींचे व्यवहार आणि मालमत्ता खरेदी-विक्रीची साखळी उघड करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. खरातच्या पोलीस कोठडीदरम्यान अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता असून, शिर्डीतील या आर्थिक जाळ्यातील अन्य सहभागी व्यक्तींची नावे समोर येण्याची चिन्हे आहेत.

खरातला मिळालेल्या पाच दिवसांच्या कोठडीमुळे तपासाला मोठी गती मिळणार आहे. पोलीस आता खरातच्या संपर्कात असलेल्या शिर्डीतील व्यक्ती, त्यांचे आर्थिक संबंध आणि व्यवहारांची पद्धत यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. विशेष म्हणजे, खरातला या गैरप्रकारांत मदत करणारे शिर्डी व परिसरातील त्याचे साथीदार कोण, याचा शोध घेतला जाणार आहे. याशिवाय, शिर्डीतील कोणत्या व्यक्ती खरातचे भक्त होते, कोणी त्याच्याकडून पूजा करून घेतल्या आणि कोणी भविष्य पाहिले, याचीही तपशीलवार माहिती गोळा केली जाणार असून यातून अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Rain News : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला; दुतोंड्या मारुतीच्या...

0
नाशिक | Nashik शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पावसाच्या (Rain) सततच्या सरींमुळे गोदावरी...