Wednesday, September 30, 2026
HomeनगरBribery News : भूमी अभिलेख उपअधीक्षकासह इसम एसीबीच्या जाळ्यात

Bribery News : भूमी अभिलेख उपअधीक्षकासह इसम एसीबीच्या जाळ्यात

सिटी सर्वे उतार्‍यात दुरुस्ती करण्यासाठी 20 हजारांची घेतली लाच

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाने सिटी सर्वे उतार्‍यात दुरुस्ती करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून कारवाई केली आहे. या प्रकरणात एक लोकसेवक व एक खाजगी इसम यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. किरण अशोक कांगणे (वय 52, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, शेवगाव) व देवेंद्र त्रिंबक फंदे (वय 40, रा. शेवगाव, ता. शेवगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

तक्रारदार यांच्या नावे असलेल्या बोधेगाव येथील सिटी सर्वे नंबर 429 च्या उतार्‍यावर धारण प्रकार / सत्ता प्रकार हे क्षेत्र क ऐवजी अ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी लोकसेवक किरण कांगणे यांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने दि. 19 जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी कारवाई केली असता लाचेची मागणी स्पष्ट झाली. त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान लोकसेवक कांगणे यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम थेट न घेता खासगी इसम देवेंद्र फंदे याच्याकडे देण्यास सांगितले.

यानुसार भूमी अभिलेख कार्यालय, शेवगाव येथील गेटजवळ पंचांसमक्ष 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना देवेंद्र फंदे यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस हवालदार संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण यांनी केली.

ताज्या बातम्या

India Alliance Meeting : मोठी बातमी! निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार;...

0
नवी दिल्ली | New Delhi 'विशेष सखोल पुनरावलोकन' (SIR) प्रक्रियेचा मुद्दा आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाईची मागणीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार)...