Thursday, March 13, 2025
Homeनाशिकनाशिकमध्ये 'स्पिरीच्युअल सिटी' साठी भूसंपादन करावे -मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

नाशिकमध्ये ‘स्पिरीच्युअल सिटी’ साठी भूसंपादन करावे -मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जागा राखीव ठेवण्याच्या देखील केल्या सूचना

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांना विकासात्मक कामांचे नियोजन करण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केला. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जागा राखीव ठेवावी. तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकास योजना तयार करताना नाशिक प्रदेशात ”स्पिरीच्युअल सिटी’ करण्यासाठी जमीन संपादित करावी,अशा सूचनाही फडणवीस यांनी केल्या.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिकसह पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी, नवीन शहर नियोजन करताना रस्ते १८ मीटर रुंदीचे करावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. प्रदेश विकास प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे. संकेतस्थळावरून जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा देण्यात याव्यात. विकास शुल्क नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने ठेवावे, अशा सूचना फडणवीस यांनी केल्या.

विकास योजना तयार करताना लागणारा कालावधी लक्षात घेता प्राधिकरणांनी विकास योजना दोन टप्प्यात करावी. पहिल्या टप्प्यात रस्ते, मलनिःस्सारण , पाणीपुरवठा, वीज पुरवठा, स्मशान भूमी, दफन भूमी आदींचा समावेश असावा. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अन्य सुविधांचा समावेश करावा. प्राधिकरणांना आवश्यकतेनुसार आकृतीबंध मंजूर करून देण्यात आलेला आहे. सध्या प्रतिनियुक्तीवर पदभरती करून या नियुक्त्या नियमित करून घ्याव्यात, असेही फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.

नाशिक विकास प्राधिकरणाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत नाशिक महापालिका आयुक्त डॉ. माणिक गोरचाळ यांनी सादरीकरण केले. बैठकीला नगरविकास, गृहनिर्माण तसेच प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पुण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करा
दरम्यान, पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिले.

प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ रस्ते जाळ्यांसाठी ६३६ कोटी ८४ लाख रुपये, रांजणगाव आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी २०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ‘अर्बन ग्रोथ सेंटर’ करिता रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी १हजार ५२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . पुणे शहर वळण मार्ग, पुणे सातारा आणि पुणे – नगर रस्त्यापासून पुरंदर विमानतळाला चांगली ‘ कनेक्टिव्हिटी ‘ तयार करण्याची सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...