Tuesday, April 7, 2026
Homeमुख्य बातम्यावसईत दरड कोसळली; चौघांची सुटका, दोघे ढिगाऱ्याखाली

वसईत दरड कोसळली; चौघांची सुटका, दोघे ढिगाऱ्याखाली

मुंबई । Mumbai

मुंबईसह (Mumbai) इतर भागात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rains) वसई पूर्वेच्या (Vasai East) वाघरळपाडा (Wagharalpada) येथील एका चाळीतील घरावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास दरड (landslide) कोसळल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही दरड कोसळल्याने अनेक घरांचे (Home) नुकसान झाले आहे. तसेच या दरडीखाली ६ जण अडकले होते. त्यापैकी ४ जणांची सुटका करण्यात आली आहे. यातील एका घरात अमित सिंग (४५) पत्नी आणि २ मुलांसह राहत होते. तर स्थानिकांच्या मदतीने आई वंदना सिंग (४०) आणि मुलगा ओमसिंग (१२) यांना बाहेर काढण्यात आले असून अद्यापही वडील अमित सिंग आणि त्यांची मुलगी रोशनी सिंग (१६) हे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ (NDRF) वालीव पोलीस (Valiv police) आणि वसई विरार महापालिका (Vasai Virar Municipal Corporation) अग्निशमन दलाचे (Fire brigade) जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अविनाश शिंदे हत्येप्रकरणी चौघांना जन्मठेप; अकरा लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik इंदिरानगर भागातील (Indiranagar Area) बापू बंगला परिसरातील प्रसिद्ध 'सुपर ग्राहक बाजार'चे मालक अविनाश शिंदे यांच्या निघृण हत्या आणि लूट प्रकरणाचा...