Friday, July 3, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई – सात कोटींच्या दरोड्याप्रकरणी पोलीस शिपायासह नऊ जणांना अटक

मुंबई – सात कोटींच्या दरोड्याप्रकरणी पोलीस शिपायासह नऊ जणांना अटक

मुंबई – मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दरोड्याप्रकरणी एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. संतोष राठोड असं पोलिसाचं नाव असून कोर्टाने त्याला 6 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या चोरीमध्ये मदत केल्याचा आरोप या पोलीस शिपायावर आहे.

करोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत अंधेरीच्या एमआयडीसीमधील नीरज इंडस्ट्री या गोल्ड मेकिंग कंपनीतून चोरट्यांनी 7 कोटी 9 लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला. तांत्रिक बाबींच्या आणि गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत क्लिष्ट अशा गुन्ह्याचा तपास करत चोरांच्या मुसक्या आवळल्या. खरंतर चोरांनी 6 एप्रिल रोजी या कंपनीत घुसून सात कोटींपेक्षा किमतीचा ऐवज पळवला होता. कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने आरोपींनी इमारतीत प्रवेश केला. गच्चीवर जाऊन कंपनीचा छताचा सिमेंटचा पत्रा तोडून आत घुसले. लोखंडी तिजोरी ग्राईंडर कटरने कापून आतील सोन्याचे हिरेजडीत दागिने, तसंच हिरे आणि इतर दागिने बनवण्याकरता आवश्यक असलेले सोनं असा एकूण 7 कोटी 9 लाख 48 हजार 992 रुपयांचा ऐवज चोरला. कंपनी मालकाला चोरी झाल्याची माहिती 22 एप्रिल रोजी समजली आणि त्याने याची तक्रार एमआयडीसी पोलिसांत केली.

- Advertisement -

पोलिसांनी तातडीने तीन पथकं तयार करुन वसई, गोरेगाव, कुर्ला, पवई, अंधेरी एमआयडीसी परिसरात आरोपींचा शोध घेतला. कंपनीतील सीसीटीव्हीत संबंधित घटना कैद झाली होती. कंपनी मालकाच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी या सीसीटीव्ही फूटेज आणि इतर माहितीच्या आधारे मुख्य आरोपी विपुल चांबरियासह सात चोरांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, पोलिसांनी मागील दोन दिवसात आणखी दोघांना अटक केली, ज्यात ओशिवारा पोलीस स्टेशनमधील कर्मचार्‍याचा समावेश आहे. या चोरीमध्ये चोरट्यांना मदत केल्याचा आरोप संतोष राठोडवर आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर 6 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत सहा कोटी 17 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...