Saturday, July 4, 2026
Homeनगरश्रीगोंदा : आढळगाव येथील तरुणाचा निर्घृण खून

श्रीगोंदा : आढळगाव येथील तरुणाचा निर्घृण खून

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- आढळगाव (ता. श्रीगोंदा) येथील मुकुंद जयसिंग वाकडे (वय 28, रा. आढळगाव) या तरुणाचा गळा, छाती, दोन्हीही हाताच्या पंजांवर आणि गुप्तांगावर वार करून धारदार हत्याराने खून करण्यात आला. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मयत तरुणाचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे शनिवारी (दि. 2) रात्री आठच्या सुमारास मुकुंद जयसिंग वाकडे ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट नं. 133/1 मध्ये डाळिंबाच्या पिकावर फवारणीसाठी गेला होता. त्यानंतर शेतातील पाईपलाईनचा वॉल फिरविण्यासाठी वडिलांनी त्याला मोबाईलवरून तीन ते चार वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मात्र मुकुंदने फोन उचलला नाही. त्यानंतर 10.15 च्या सुमारास विजय लहानू वाकडे याने मुकुंदच्या गळ्याला तार लागल्याने तो जखमी झाल्याचे सांगून तातडीने डाळिंबाच्या शेतात येण्याचे सांगितले. मुकुंदचे आई, वडील व भाऊ यांनी डाळिंबाच्या शेतात जाऊन पहिले असता मुकुंद ट्रॅक्टरजवळ पडल्याचे व त्याच्या गळा, छाती, दोन्हीही हाताचे पंजे आणि गुप्तांगावर जखमा झाल्याचे दिसले. तो मयत झाल्याचेही लक्षात आले. शवविच्छेदनासाठी त्याचे शव श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनला याची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून हा खुनाचा प्रकार असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठलराव पाटील करत आहेत.

क्रूर पद्धतीने खून
मयत मुकुंदच्या गळा, छाती व हातावर तीक्ष्ण हत्याराने वार आहेतच, पण त्याचे गुप्तांगही कापून टाकले आहे. हा खून नाजूक संबंधातून झाला असल्याचा पोलिसांना संशय असून, तपासाची ती एक दिशा असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 210 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 449 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...