Saturday, July 4, 2026
Homeनगरनगर – महापालिकेकडून कारवाई मोहीम

नगर – महापालिकेकडून कारवाई मोहीम

अहमदनगर – मास्क, सोशल डिस्टन्स याचे पालन न करणार्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शुक्रवारी सकाळी सकाळी गुलमोहर रस्त्यासह सावेडी परिसरात महापालिकेने कारवाई सुरू करताच भाजी, दूध विक्रेत्यांसह नागरिकांतही खळबळ उडाली. गुलमोहर रोडवर पारिजात चौकात सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या, मास्क न वापरणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर तसेच नागरिकांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे. १२ जणांकडून ६००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

दक्षता नियंत्रण पथकाचे प्रमुख तथा यंत्र अभियंता परिमल निकम, गणेश लयचेट्टी, शशिकांत नजान, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, गंगाराम धोंगडे, रंगनाथ भालेराव, संजय चाबुकस्वार, बाळासाहेब पवार, गोरक्षनाथ देठे, भारत कंडारे, बाळू वाकचौरे, ऋषिकेश भालेराव, कन्हैया चावरे, विश्र्वास जगधने आदींच्या पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई यापुढे अधिक कठोर करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...