शिर्डी – येथील संभाजीनगरमध्ये पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिला चाकूने भोसकून व स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले आहे.
आरोपी कैलास ठोकळ याने पत्नीला जबर जखमी केल्यानंतर आसपासच्या लोकांनी जखमीला शिर्डीच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले, या प्रकाराने शिर्डी व परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊनमुळे शिर्डीच काय परंतु जिल्ह्यात शांतता वाटत असताना हा प्रकार घडल्याने सर्वत्र मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.




