Tuesday, October 13, 2026
Homeनाशिकइंदिरानगर परिसरात घरफोडी; ८० हजार रुपयाचा एवज लंपास

इंदिरानगर परिसरात घरफोडी; ८० हजार रुपयाचा एवज लंपास

इंदिरानगर | वार्ताहर

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 80 हजार रुपयाचा एवज चोरून नेल्याची घटना सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकांत ठाकरे (वय 56, रा. बंगला नंबर 19 सिद्धिविनायक हौसिंग सोसायटी, इंदिरानगर ) हे 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत बाहेरगावी गेले होते.

- Advertisement -

त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून 55 हजार रुपयांचे सोने व रोख तीस हजार रुपये असा एकूण 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 380, 454, 45 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाकले करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी फोन डिप्लोमसी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी फोन डिप्लोमसीचा वापर करत राजकीय समीकरणे...