Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रमान्सूनचे राज्यात आगमन

मान्सूनचे राज्यात आगमन

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – प्रतिक्षेत असलेल्या मान्सूनचे गुरुवारी राज्यात जोरदार आगमन झाले आहे. गोवा, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग त्याने व्यापला असून आगामी चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात हा मान्सून पोहचेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, पुढील चार दिवस म्हणजे 14 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

निसर्ग वादळाने संपूर्ण बाष्प शोषल्याने मान्सून लांबला होता. या वादळाच्या प्रभावाने तो कर्नाटकात स्थिर झाला होता. पण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तो गतिमान होऊन महाराष्ट्रात दाखल झाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा परिसरात पुढील पाच दिवस चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यात आजपासून हळूहळू पावसाचा जोर वाढेल. 12 जून ते 15 जूनच्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल. तर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही पुढील काही दिवस मुस ळधार पावसाचा अंदाज आहे.

बंगालच्या खाडीत लवकरच एक कमी दबावाचं क्षेत्र निर्माण होत आहे. सध्या बंगालच्या खाडीचं मध्य-पूर्व आणि त्याजवळच असलेल्या बांगलादेश तसंच म्यानमारच्या किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळाच्या वार्‍याचं क्षेत्र निर्माण झालं आहे. वातावरणाची परिस्थिती आणि सागरी परिस्थितीमुळे असे संकेत मिळत आहेत की, लवकरच या क्षेत्राचं रुपांतर निम्न दबावच्या क्षेत्रात होईल. अशीच परिस्थिती राहिली तर देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा या भागातून मान्सून पुढे सरकत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील पाच दिवसात राज्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 12, 13, 14 जून या दिवसात चांगला पाऊस होईल, अशी माहिती कश्यपी यांनी सांगितलं.

कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 6.5 सेंटीमीटर ते 11.5 सेंटीमीटर इतका पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 13 जून रोजी मुंबईतही अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसात कोकण व मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...