Tuesday, October 13, 2026
Homeनाशिकचौसाळे ग्रामपंचायत सरपंच पदी भास्कर जोपळे

चौसाळे ग्रामपंचायत सरपंच पदी भास्कर जोपळे

चौसाळे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील चौसाळे ग्रुप ग्रामपंचायतीत नुकतीच सरपंच पदाची निवडणूक झाली त्यात भास्कर यशवंत जोपळे यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायतचे सरपंच कै. पोपट हिरामण तुंगार हे आजारपणा मुळे मयत झाल्यामुळे सरपंच पदाची रिक्त जागा झाली होती. पिंगळवाडी येथिल सदस्य कांताबाई पंडीत भरसठ ह्या पण मयत झाल्या मुळे दोन सदस्य पदाची पोट निवडणूक लागली परंतु एक हि उमेदवार नी फार्म न भरल्यामुळे सात सदस्य मधे सरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली.

- Advertisement -

सरपंच पदी भास्कर जोपळे, मथाबाई जाधव, चंद्रभागाबाई तुंगार, हिरामण गावित, वसंत भरसठ, मिराबाई चौधरी, या सहा उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यात मथाबाई जाधव व चंद्रभागाबाई तुंगार यांचे अर्ज बाद झाले. वसंत भरसठ, मिराबाई चौधरी यांनी माघार घेतली. सरपंच पदासाठी भास्कर जोपळे व हिरामण गावित यांचे अर्ज होते. भास्कर जोपळे यांना बहुमत असल्याने सरपंच पदी निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक आधिकारी राठोड, ग्रामसेवक जे.एच पवार यांच्या उपस्थितीत सरपंच निवड पार पडली. उपस्थितीत ग्रामस्थांनी सरपंच भास्कर जोपळे यांचे अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी फोन डिप्लोमसी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी फोन डिप्लोमसीचा वापर करत राजकीय समीकरणे...