Sunday, July 5, 2026
Homeदेश विदेशदिल्लीत एकाच इमारतीत आढळले 41 करोना रुग्ण

दिल्लीत एकाच इमारतीत आढळले 41 करोना रुग्ण

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील एकाच इमारतीमधील 41 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. एकाचवेळी इतके रूग्ण आढळल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

राजधानी दिल्लीच्या दक्षिण पश्चिमी भागात कापसहेडा येथील एका इमारतीत 18 एप्रिल रोजी एक व्यक्ती करोनाग्रस्त आढळला होता. त्यानंतर इमारतीमधील सर्वांची करोना टेस्ट करण्यात आली. एक दोन नव्हे तब्बल 41 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर या इमारतीला सॅनेटाझर करून सील करण्यात आलं होतं. हा दाटीवाटीचा परिसर असून करोनाग्रस्त आढळलेल्या इमारतीत एकूण 175 घरं आहेत. त्यामधील 41 जणांना करोनाची लागण झाली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून नर्सची 13 लाखांची फसवणूक

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 33 वर्षीय खाजगी नर्सची तब्बल 13 लाख रुपये आणि तीन तोळे सोन्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...