Friday, July 3, 2026
Homeनगरआज आणखी तीन रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

आज आणखी तीन रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

जिल्ह्यात करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली 73

अहमदनगर – जिल्ह्यातील आणखी 03 रूग्ण आज करोना मुक्त होऊन घरी परतले आहे. या 03 रुग्णांना आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 73 झाली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील 32 वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील 24 वर्षीय युवक आणि अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील 56 वर्षीय व्यक्ती करोनातून बरे झाले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी बूथ हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी त्यांना निरोप देऊन पुढील चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यातील करोना बाधित रुग्ण बरे होत असून नागरिकांनी मुळात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : घराचा स्लॅब कोसळला; आजी सह नातवाचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon शहरात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कलेक्टर पट्टा भागातील घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत आजीसह नातवाचा जागीच मृत्यू झाला. दुपारी...