Friday, May 3, 2024
Homeनगरनगर – जुळ्या मुलांना जन्म देणारी करोना बाधित महिलेचा मृत्यू

नगर – जुळ्या मुलांना जन्म देणारी करोना बाधित महिलेचा मृत्यू

अहमदनगर (प्रतिनिधी) –येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा आज शुक्रवारी सकाळी ८-४५ वाजता मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या महिलेचे काल सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने काल एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत ठीक आहे.

या महिलेला सीझरियन प्रसूती झाल्यानंतर आयसियू मध्ये ठेवण्यात आले होते. कोरोना बाधीत असलेल्या या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती, असे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले. ही महिला मुंबईहून निंबलक येथे आली होती. त्यानंतर तपासणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या