Friday, July 3, 2026
Homeनगरजिल्ह्यातील ०८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यातील ०८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

आणखी ०९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले
अहमदनगर –   जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आज सकाळी ०८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. हे सर्व  अहवाल निगेटिव्ह आले  आहेत. आज पुन्हा ०९ व्यक्तींचे घशातील स्त्राव घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १५४६ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४७३ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. एकूण ४३ बाधीत व्यक्तींपैकी २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून १६ जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोन बाधीत व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...