Saturday, July 4, 2026
Homeनगरडिस्टिलरींना सॅनिटायझरची किरकोळ विक्री करण्याचे परवाने देणार

डिस्टिलरींना सॅनिटायझरची किरकोळ विक्री करण्याचे परवाने देणार

रास्त किंमतीत सॅनिटायझर उपलब्धतेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा निर्णय

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – उत्पादक वितरण व विक्रेत्यांच्या साखळीत डिस्टिलरी त्यांचे सॅनिटायझरची किरकोळ विक्री करण्यास असमर्थ असल्याने त्यांना त्यांनी तयार केलेल्या सॅनिटायझरची रास्त किंमतीत ग्राहकांना विक्री करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेवून अन्न व औषध प्रशासनाने डिस्टिलर्‍यांना किरकोळ विक्रीचे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

याबाबत राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात या विभागचे आयुक्त श्री. उन्हाळे यांनी म्हटले की, सध्या करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. सदर मागणीमुळे भाववाढ, काळाबाजार, साठेबाजी इत्यादी बाबी होऊ नये, सॅनिटायझरचा तुटवडा होऊ नये म्हणून राज्यातील साखर कारखानदाराकडे उत्पादन होत असलेले अल्कोहोलचे रुपांतर सॅनिटायझरमध्ये करून विक्री करण्याची तयारी राज्यातील डिस्टिलरीजने दाखविली व सॅनिटायझर उत्पादनासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार त्यांना परवाना नमुना 25 मंजूर करण्यात आले आहेत. सदर परवान्या अंतर्गत त्यांना डब्लूएचओच्या फॉर्म्युल्याप्रमाणे उत्पादन सुरु करण्याची परवानगी दिलेली आहे.

सदर परवाना नमुना 25 च्या तरतुदीनुसार परवानाधारक घाऊक औषधे विक्री परवानाच्या अटींचे अनुपालन करून या परवाना नमुना 25 अंतर्गत उत्पादन केलेली औषधे विक्री करू शकतो. घाऊक औषधे विक्रीच्या अटी परवाना नमुना 20 बी व नियम 65 मध्ये नमूद या अटी बघता उत्पादक, विक्री परवाना धारकांना, शासनाच्यावतीने खरेदी करणार्‍यांना, रुग्णालयाला, वैद्यकीय, शैक्षणिक व रिसर्च करणार्‍या संस्थांना किंवा वैदयकीय व्यावसायिकांना त्यांच्या रुग्णासाठी विक्री/वितरण करू शकतो.

वरील बाबी बघता डिस्टिलर्‍यांनी उत्पादन केलेले सॅनिटायझर ते विक्री परवाना धारकांना किंवा वर नमूद संस्था/व्यक्ती व्यतिरिक्त इतर ग्राहक/रुग्णांना /संस्थांना करू शकत नसल्याचे मत काही अधिकार्‍यांनी दिले आहे. मात्र औषध उत्पादक वितरण व विक्रेत्यांच्या साखळीत डिस्टिलरी त्यांचे सॅनिटायझरची किरकोळ विक्री करण्यास असमर्थ असल्याने त्यांना त्यांनी तयार केलेल्या सॅनिटायझरची विक्री रास्त किंमतीत ग्राहकांना करण्यात अडचणी येत आहेत.

या सर्व बाबी विचारात घेता या परवानाधारक डिस्टिलतिने किरकोळ औषधे विक्री परवाना नमुना 20 ए मंजूर करून घेतल्यास त्यांना या नमुना 20-ए परवाना अंतर्गत त्यांनी उत्पादन केलेल्या सॅनिटायझरची विक्री/वितरण सर्रास करता येईल. त्यासाठी सॅनिटायझर उत्पादन करणार्‍या डिस्टिलर्‍यांनी परवाना नमुना 25 मंजूर परवानाधारकांनी 600 रुपये परवाना शुल्क ऑनलाईन भरून नमुना 20 ए परवाना मंजुरीसाठी अर्ज केल्यास त्यांना सॅनिटायझर किरकोळ विक्री करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...