हरसूल : गिरणारे जवळील धोंडेगाव येथे पत्ता विचारण्याच्या वादातून शेतकऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
मोतिराम बेंडकोळी (रा. धोंडेगाव, गिरणारे) असे खून झालेल्या शेतकर्याचे नाव आहे.
- Advertisement -
दरम्यान सोमवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. शेतातुन घरी परतणार्या शेतकर्यास अनोळखी कारमधील व्यक्तिंनी पत्ता विचारला यातून झालेल्या वादातुन कारमधील व्यक्तिंनी शेतकर्यावर धारदार शस्राने हल्ला केला. यात शेतकर्याचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी हरसुल पोलीस तपास करत आहेत.




