Friday, July 3, 2026
Homeनगरकरोनाबाधित रुग्ण आढळल्याने लोणी खुर्द व प्रवरानगर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित

करोनाबाधित रुग्ण आढळल्याने लोणी खुर्द व प्रवरानगर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित

शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द प्रवरानगर येथे करोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने, या परिसरातील करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात, लोणी खुर्द, प्रवरानगर येथील कारखाना रोडच्या पूर्व बाजूचा पंचवटी क्षेत्र, शांतिनाथ मंगल कार्यालय परिसर, आहेर वस्ती, कारखाना पश्चिम बाजू पाथरे रोड व मौजे कोल्हार बुद्रुक गावातील प्रवरानगर पंचवटी भाग कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. तसेच पाथरे रोड हे ठिकाण प्रवेश व बाहेर जाण्यासाठी निश्चित करण्यात आले असल्याचे आदेश राहाता तहसीलदार तथा इन्सीडंट कमांडर कुंदन हिरे यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी दिनांक 7 जून 2020 रोजीच्या दुपारी 12 वाजेपासून दि. 20 जून 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांना ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग अधिनियम, 1897 लागू करून खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.

- Advertisement -

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी, असे आदेशित करण्यात आले आहे. यात, कोअर एरिया प्रतिबंधीत करणे, आत किंवा बाहेर जाण्याचा मार्ग बॅरिकेटींग करावा,अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही व सदर प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडून येऊ शकणार नाही.

प्रतिबंधित क्षेत्रात जाणारा व्यक्ती तपासणी केल्याशिवाय आतमध्ये न सोडणे, प्रतिबंधीत क्षेत्रात जाणार्‍या/येणार्‍या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेऊन साथरोग सर्वेक्षणामार्फत पाठपुरावा करण्यात यावा, प्रतिबंधीत क्षेत्रात विशेष पथकाद्वारे आदेशापासून 14 दिवस पावेतो घरोघरी सर्वेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेणे, शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संशयितांचे तपासणी नमुने घेणे, सर्वप्रकारच्या धार्मिक व सामुदायिक कार्यक्रमाला बंदी, अत्यावश्यक कारणाशिवाय प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्तींना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर निघण्यास प्रतिबंध आहे.

तसेच समन्वय अधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक क्षेत्रात जिवनाश्यक वस्तूंचा घरपोहोच सशुल्क पुरवठा करणे, सामाजिक विलगीकरणाचे कटाक्षाने पालन करणे, मशिद, मंदिर याठिकाणी प्रार्थनेसाठी तसेच नमाज पठण, इफ्तार यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा व इतर समन्वयकाची जबाबदारी तालुका आरेाग्य अधिकारी यांची राहील. दूध, किराणा, भाजीपाला व इतर जिवनावश्यक वस्तु यांचे नियोजन संबंधित सहायक नियंत्रण अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी करावे. प्रतिबंधीत क्षेत्रासाठी 24 बाय 7 पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक, लेाणी यांनी लावावा.

प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर आपत्कालिन परिस्थितीत आत किंवा बाहेर जायचे असल्यास त्याचे अधिकार पोलीस निरीक्षक, लोणी यांना प्रदान करण्यात आले आहेत. उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम 1897 च्या भारतीय दंड संहिता व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 56 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...