Saturday, July 4, 2026
Homeनगरबाजार समित्यांसह कृषीविषयक कामे आजपासून सुरू

बाजार समित्यांसह कृषीविषयक कामे आजपासून सुरू

जिल्हाधिकार्‍याचे आदेश : कॅटोन्मेंट झोन वगळता विविध बाबींना परवानगी

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊनच्या मुलभूत तत्वांचे पालन करणे बंधनकारक करत कॅटोन्मेंट झोन वगळता जिल्हा प्रशासनाकडून बाजार समित्यांसह जिल्ह्यातील कृषीविषयक बाबींसह अन्य कामांना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी रात्री आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. ज्या अतिरिक्त बाबींना परवानगी देण्यात आली आहे त्यात, कृषी, आस्थापना, सामाजिक क्षेत्र, वन उत्पादन, मत्स्य उत्पादन आणि पशू संवर्धन, वित्तीय क्षेत्र, मनरेगा, सार्वजनिक सोयीसुविधा आदीसह विविध बाबींचा समावेश आहे.

- Advertisement -

जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेकामी यापूर्वीच प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आलेले आहेत. त्याची कार्यवाही सुरू राहणार असून जिल्ह्यातील कॅटोन्मेंट झोन वगळता अन्य उपक्रमांचा या समावेश करण्याचा आदेश आज जारी करण्यात आला आहे. यात जिल्हयातील महानगरपालीका, सर्व नगरपालीका-नगरपंचायत व भिंगार कॅटोन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये सर्व खाजगी वाहने व सर्व खाजगी प्रवासी वाहतुक करणार्‍या वाहनाच्या वाहतुकीसाठी 3 मे पर्यंत बंधन लागू राहणार आहेत.

मात्र, कृषी विषयक बाबी कृषी विषयक सर्व कामे, तूर, कापूस व हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचे व्यवहार सुरु राहतील, फळे, भाज्या, धान्ये यांचा लिलाव सुरू राहतील, तसेच सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ घाऊक व्यापारी, अधिकृत नोंदणीकृत खरेदीदार, शेतकरी यांनाच प्रवेश करण्याची मुभा राहील. लिलावांच्या ठिकाणी हात धुण्याची पुरेशी व्यवस्था, हॅण्ड वॉश, सॅनिटाईजर्स उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांची असेल. तसेच लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असणार्‍या सर्व संबंधितांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. नगर शहरात महानगरपालिका आयुक्त तर अन्य ठिकाणी मुख्याधिकारी सर्व (नगरपालिका/नगरपंचायत) यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.

तसेच कृषी यंत्राशी संबंधित कामे सुरु राहतील, यात कृषी संबंधित उपकरणे, यंत्रे यांची निर्मिती, वितरण व त्यांची किरकोळ विक्री करणारे सर्व दुकाने, दुरुस्ती करणारी सर्व दुकाने,खते, किटकनाशके व बी-बियाणे यांची दुकाने सुरु राहतील. पिक कापणी, मळणी, काढणी यांच्या वापरात येणारी यंत्रे, उपकरणे उदा. हारवेस्टर व तत्सम यांना राज्यांतर्गत व आंतरराज्यीय वाहतुकीची परवानगी असेल. शेतमाल वाहतुक व विक्री, बियाणे, खते व किटक नाशके यांचे उत्पादन, साठवणुक, वाहतुक व विक्रीस परवानगी राहणार आहे.

वाहतूक क्षेत्रात सर्व वस्तू व मालाची वाहतूक, ने-आण करता येईल. रेल्वेद्वारे वस्तू, माल, पार्सल यांची ने-आण करता येईल. सर्व प्रकारचे वस्तू व माल वाहतूक करणारे ट्रक व तत्सम वाहने हे वाहतूक करतांना केवळ दोन चालक व एक हेल्पर यांच्यासोबतच वाहतूक करतील. तसेच माल, वस्तू पोहोच केल्यानंतर रिकाम्या झालेल्या वाहनांना देखील वाहतुकीसाठी परवानगी असेल, तथापि वाहन चालवणार्‍यांकडे वैध परवाना असणे अनिवार्य राहील. ट्रक व तत्सम माल वाहतूक करणार्‍या वाहनांची दुरुस्ती करणारी दुकाने सुरु राहतील. बांधकाम क्षेत्रात रस्ते बांधणी, सिंचन प्रकल्प,सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांची बांधकामे (ग्रामीण भागातील सुक्ष्म, लघू व मध्यम प्रकल्पासहीत), पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा करणार्‍या तारा ओढणे, ऑप्टीकल केबल/ फायबर यांचेशी संबंधित बांधकामे सुरु राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 210 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 449 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...