Thursday, July 2, 2026
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर : शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी

त्र्यंबकेश्वर : शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी

त्र्यंबकेश्वर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा प्रतिष्ठानतर्फे त्र्यंबकनगरीत भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील युवा प्रतिष्ठानने सामाजिक भान राखत शिवजयंती साजरी केली आहे. येथील माउली हॉस्पिटलच्या सहकार्याने भव्य रक्तदान व नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा प्रतिष्ठानचे हे सलग दुसरे वर्ष असून शहरातील अमृतकुंभ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७५ बॅग रक्त जमा झाले आहे.

- Advertisement -

यासाठी युवा नेते अमोल दिनकर पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे , शिवसेनेचे रवी वारुंगसे, नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, नगराध्यक्ष सागर उजे, डॉ.पंकज बोरसे, डॉ. रोहित शेजवळ, डॉ. सचिन काळे, ऍड. भास्कर मेढे, गोटीराम करंडे, निम्स हॉस्पिटलचे डॉ.किरण पाटील, सचिन देवरे, मोनाली कापडणीस, युवा प्रतिष्ठाणचे संदीप चव्हाण, सचिन बोडके, विशाल मींदे, कैलास मींदे, विलास बोडके, योगेश बोडके, छोटू पवार तसेच आर्मी मध्ये कार्यरत असलेले गोरख कसबे, संतोष चव्हाण, विजय तिदमे, गोटीराम ससाणे आदी सह युवा प्रतिष्ठाणचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी १४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbaiआषाढी एकादशीच्या वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या सुमारे १ हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य...