Thursday, May 2, 2024
Homeनाशिकशिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ८ मार्च पर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ८ मार्च पर्यंत मुदतवाढ

नाशिक : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास प्रवर्ग बहुजन कल्याण विभागाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रतीपूर्ती योजनांसाठी ऑनलाईन भरण्यास दि.8 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील अर्ज तपासणी करून पात्र अर्ज फॉरवर्ड करण्यासाठी दि.08 मार्च 2020 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

- Advertisement -

महाविद्यालयांनी विहीत कालावधीत आपल्या लॉगीन वरील प्रलंबित अर्जांची तपासनी करून, त्रुटी पुर्तता करून केवळ पात्र अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयास ऑनलाइन सादर करावेत. विहीत कालावधीत कार्यवाही न केल्यास पात्र विदयार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास संबंधित प्राचार्य जबाबदार राहतील.

याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास प्रवर्ग बहुजन कल्याण विभाग यांची जबाबदारी राहणार नाही. याची सर्व महाविदयालयांनी दखल घ्यावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नाशिक श्रीमती प्राची वाजे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या