Thursday, July 2, 2026
Homeनाशिकसिन्नर : माळेगावचे ग्रामविकास अधिकारी बनले खांदेकरी

सिन्नर : माळेगावचे ग्रामविकास अधिकारी बनले खांदेकरी

माळेगाव : तालुक्यातील माळेगाव येथे आधार नसलेल्या सतीश नामक १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र सतीशला कुणीही नसल्याने व एकुलती एक बहिण सासरी असल्याने त्याचे अंत्यसंस्कार येथील अधिकारी वर्गाने केले आहे.

दरम्यान सतीश ञ्यंबक जाधव या मुलाचे आज दिर्घ आजारानं निधन झाले. आई, वडील, भाऊ मयत असून एक बहीण सासरी गेलेली असल्याने लॉक डाऊन मुळे तिला शक्य झाले नाही.

- Advertisement -

अशावेळी ग्रामविकास आधिकारी श्री.कैलास वाघचौरे यांनी सरपंच प्रतिनिधी श्री. सुर्यभान सांगळे यांना साथीला घेत अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मयतास खांदा देत माणुसकी दाखवली.

ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे, सरपंच प्रतिनिधी श्री.सुर्यभान सांगळे, तलाठी श्री.देशमुख, माजी सरपंच श्री.तुकाराम सांगळे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री.विलास आवारे, पोपट पिंपळे, सोमनाथ मोहने व शिवाजी कापसे यांनी अंत्यविधी पार पाडला.

ताज्या बातम्या

RTI Maharashtra : अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका, माहिती अधिकार कायद्यातील बदलांना...

0
मुंबई । Mumbai माहितीचा अधिकार (RTI) अधिक सक्षम आणि पारदर्शक होण्याऐवजी, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे नवे नियम अखेर मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. ज्येष्ठ...