Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदिंडोरी शहरातील निर्मला विहार परिसर सील

दिंडोरी शहरातील निर्मला विहार परिसर सील

दिंडोरी : शहरात करोना रुग्ण आढळल्याने निर्मला विहार परिसर सील करण्यात आला आहे. दिंडोरीत चार दिवस पेट्रोल पंपा सह चार दिवस लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार बँद राहणार आहे.

निळवंडी, मोहाडी पाठोपाठ दिंडोरीतील निर्मला विहार येथेही एक रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दिंडोरी हादरले आहे.दिंडोरी शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महत्व पूर्ण निर्णय घेण्यात आला. करोना साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. सर्वांनी उत्स्फूर्त निर्णयप्रक्रियेत सहभाग घेतला.

- Advertisement -

सद्यस्थितीत सर्व जग कोविड १९ करोना विषाणुशी लढा देत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभरात विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासन तथा केंद्र शासन यांच्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांमध्ये शासनाने संपूर्ण महाराष्ट्रभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालय आणि बँका वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने, संस्था, व्यवसाय इत्यादी सुरू ठेवणेस बंदी घातलेली आहे.

लाॅकडाऊनचाच एक भाग म्हणून दिंडोरी नगरपंचायत हद्दीमध्ये नगरपंचायत व शासकीय यंत्रणांमार्फत विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. दिंडोरी शहराच्या लगतच्या परिसरामध्ये व शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन नियोजित लॉक डाऊन ची शंभर टक्के अंबलबजावणी करणे करिता दिंडोरी शहरातील तील अत्यावश्यक सेवा पैकी मेडिकल आणि दूध वगळता किराणा दुकाने, भाजीपाला मार्केट आणि इतर सर्व दुकाने दिनांक १७ मे २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयसर्वानू मते घेण्यात आला आहे.

तरी सर्व नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करून शहरांमध्ये मेडिकल व दूध सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवावीत. नागरिकाने अनावश्यक रित्या बाहेर फिरू नये. तोंडाला मास्क वापरावा. सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे. वेळोवेळी सॅनिटायझर व हॅन्डवॉश चा वापर करावा. तसेच कुठल्याही कारणाने घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन दिंडोरी नगरपंचायत मार्फत सर्व व्यावसायिक तथा नागरिकांना करण्यात आले आहे.दरम्यान निर्मला विहार परिसर सील करण्यात आला आहे.पुढे उपाययोजना आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या