Friday, July 3, 2026
Homeनाशिकसिन्नर : पाथरे येथे वीज तारांच्या धक्क्याने सहा गायींचा मृत्यू

सिन्नर : पाथरे येथे वीज तारांच्या धक्क्याने सहा गायींचा मृत्यू

पाथरे : तालुक्यातील पाथरे खुर्द येथील विजेची तारांच्या धक्क्याने सहा गायी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.

पाथरे खुर्द येथील पोहेगाव रोड लगत शेतात वस्ती करून राहणाऱ्या ज्ञानदेव नंदू निकम यांच्या गायींच्या शेड आहे. यावेळी या शेडवर उच्च वीजवाहक ११ केव्ही तारा तुटल्याने शेडमध्ये बांधलेल्या सहा गायी विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्या. यापैकी पाच गायी गर्भार असून यात एका वासराचा समावेश आहे.

- Advertisement -

निकम यांच्या आर्थिक स्थिती साधारण असून शेती व्यवसायास पूरक म्हणून या गाईंच्या दूध व्यवसाय निकम करत होते. अचानक झालेल्या या हानीमुळे या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात जवळपास पाच लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

यावेळी विद्युत पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला. येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता एच.एस.मांडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पंचनामा करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...