Thursday, July 2, 2026
Homeनगरनेप्ती बाजार समितीच्या आवारातून दोन टन कांदा चोरला

नेप्ती बाजार समितीच्या आवारातून दोन टन कांदा चोरला

अहमदनगर (प्रतिनिधी) – नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून व्यापार्‍याने शेतकर्‍याकडून खरेदी केलेला दोन टन 934 किलो कांदा चोरून नेल्याची घटना 4 जानेवारी रात्री घडली.

याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा व्यापारी बाळासाहेब बायाजी आंधळे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

आंधळे नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा व्यापारी आहेत. यासाठी त्यांनी बाजार समितीचा एक गाळा घेतला आहे. शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या कांदा ते गाळ्यात टाकत असतात. 4 जानेवारीला रात्री गाळा उघडा असताना चोरट्याने 55 हजार 500 रूपये किंमतीचा दोन टन 934 किलो कांदा चोरून नेला.

याप्रकरणी आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक शिंदे करत आहे.

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...