Sunday, July 5, 2026
Homeदेश विदेशबांधकाम उद्योजकांनी ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर घरे विकावीत – गडकरी

बांधकाम उद्योजकांनी ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर घरे विकावीत – गडकरी

मुंबई – लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी देशातील बांधकाम उद्योजकांनी त्यांच्याकडे तयार असलेली घरे ना नफा, ना तोटा तत्त्वावर विकावीत, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या पदाधिकार्‍यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीत गडकरी यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला देशभरात अनेक बांधकाम प्रकल्पांमधील घरे पडून आहेत. लॉकडाऊमुळे पुढील काही काळ तरी घरांची खरेदी होणार नाही. या काळात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज भरत राहावे लागेल. हे नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता ही घरे विकून टाकावीत. जेणेकरून बांधकाम उद्योजकांना त्यामधून आलेल्या पैशाचा वापर इतर प्रकल्पांसाठी करता येईल. तसेच आगामी काळात बांधकाम क्षेत्राने वाहन क्षेत्राप्रमाणे स्वत:च्या अशा बिगरबँकिंग वित्तसंस्था सुरु कराव्यात.

वाहननिर्मिती क्षेत्राकडून अशा संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. बांधकाम क्षेत्राकडूनही अशा संस्था सुरु झाल्यास त्यांना ग्राहकांना वेगाने आणि स्वस्त दरात कर्जपुरवठा करता येईल. याशिवाय, आता बांधकाम उद्योजकांनी केवळ घरउभारणी सोडून इतर क्षेत्रांकडे मोर्चा वळवला पाहिजे. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक सुविधा आणि वेअरहाऊसिंग निर्मितीच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत. तसेच बांधकाम उद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्पांचा खर्च कमी केला पाहिजे. यामुळे भांडवलपुरवठा सुरळीत राहून प्रकल्पांचे काम सुरु ठेवता येईल, असे गडकरी यांनी सांगितले.NA­REDCO चे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी गडकरींच्या या सुचनांची प्रशंसा केली आहे. याशिवाय, लवकरच केंद्र आणि राज्य सरकारकडून आपल्या कर्मचार्‍यांसाठी मोठ्याप्रमाणावर घरे खरेदी करण्यात येणार आहेत. अशावेळी NA­REDCO ने सरकारला चांगला प्रस्ताव दिल्यास हा व्यवहार मार्गी लागेल. यामधून बांधकाम उद्योजकांच्या हाती चांगला पैसा पडेल, असा पर्यायही गडकरी यांनी बैठकीत सुचवला.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून नर्सची 13 लाखांची फसवणूक

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 33 वर्षीय खाजगी नर्सची तब्बल 13 लाख रुपये आणि तीन तोळे सोन्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...