Thursday, July 2, 2026
Homeनगरअकोले तालुक्यात पावसाची हजेरी

अकोले तालुक्यात पावसाची हजेरी

कोतुळ (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात अवकाळी पावसाने आज दुपारी हजेरी लावली आहे.

दिवसभर उन्हाचा चटका असह्य झाल्यानंतर आज दुपारी 4 ते 6 वाजण्याच्या सुमारास कोतुळ परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. कांदा पीक काढणीला आले आहे. कांदा काढणीच्या काम काही ठिकाणी सुरूवात झाली असून पावसापासून कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. तर पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकांना पावसाचे पाणी मिळाल्याने पिकाची भरणी झाल्याने काही शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...