Thursday, July 2, 2026
Homeनगरअत्यावश्यक सेवेचा फलक लावून गोमांसची वाहतूक

अत्यावश्यक सेवेचा फलक लावून गोमांसची वाहतूक

संगमनेर (शहर प्रतिनिधी)ः- शहरात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी सुरू असली तरी कत्तलखाने मात्र सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. संगमनेरातील कत्तलखान्यातून मुंबईकडे पाठवण्यात येत असलेले सुमारे पाच हजार किलो गोवंश जातीचे मांंस नांदुर-शिंगोटे परिसरात पकडण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेच्या फलक लावलेल्या टेम्पोतून हे मांस नेले जात असताना संगमनेरच्या हद्दीत हे वाहन पकडण्यात न आल्याने संगमनेरातील पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात आहे. यामुळे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास मनाई आहे. असे असतानाही संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखान्यामधून गोवंश जातीच्या जनावरांची खुलेआम कत्तल होत आहे. संगमनेरातील मांस वेगवेगळ्या वाहनांमधून ठाणे, मुंबईला पाठविले जाते. यापूर्वी संगमनेरातील कत्तलखान्यावर शेकडो वेळा कारवाया करण्यात आल्या आहेत असे असतानाही शहरातील कत्तलखाने सुरूच असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात पोलीस आक्रमक झाले आहे. लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी ते करीत आहे. खासगी वाहनांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. या वातावरणातही कत्तलखाने मात्र सुरूच असल्याचे दिसत आहे. संगमनेरच्या कत्तलखान्यातून तयार झालेले मांंस अत्यावश्यक सेवा फलक लावलेल्या वाहनातून नेले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी संगमनेरातील कत्तलखान्यावर त्वरीत कारवाई करण्याची गरज आहे.

कर्‍हे घाटातील चौकीचा फायदा काय?
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून धावणार्‍या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यातील कर्‍हे घाटाच्या परिसरात पोलीस चौकी अस्तित्वात आहे मात्र ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था या चौकीची आहे. वाहतूक पोलीस या ठिकाणी क्वचितच दिसतात. घाटाच्या पायथ्याशी काही पोलीस थांबतात. संगमनेरातून मोठ्या प्रमाणावर गोमांसची वाहतूक कर्‍हे घाटातूनच होत असल्याचे दिसून येते. या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या ही बाब निदर्शनास का येत नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...