Friday, July 3, 2026
Homeनगरश्रीगोंदा : घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

श्रीगोंदा : घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

श्रीगोंदा ( ता. प्रतिनिधी)– तालुक्यातील चिखली येथील महादेव पांडुरंग झेंडे या शेतकऱ्याच्या राहत्या घराला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आग लागून शेतकऱ्याचे घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू जळाल्याने तसेच २ शेळ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे  दि.२१. रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झेंडे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून या आगीत घरातील संसार उपयोगी वस्तू, ज्वारी बाजरी गहू आणि हरबरा असे २० पोते धान्य, नवीन बैलजोडी विकत आणण्यासाठी ठेवलेले 30 हजार रुपये रोख व 2 तोळे सोनं असा ऐवज जळून खाक झाला तर या घटनेत 2 शेळ्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच गावचे सरपंच, तसेच गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत लागलेली आग आटोक्यात आणली.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...