Thursday, July 2, 2026
Homeनगरश्रीरामपुरात रेल्वे बोगी लुटली

श्रीरामपुरात रेल्वे बोगी लुटली

श्रीरामपूर (प्रतिनिधी- शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये गव्हाची पोती घेऊन जाणारी रेल्वे बोगी लुटल्याची घटना काल दुपारी घडली. काल दुपारी रेल्वे मालगाडी चितळीच्या बाजूने श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वेस्थानकावर येत असताना ती मालगाडी अचानक शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये थांबली. त्याचाच फायदा घेऊन परिसरातील काही जणांनी मालगाडीच्या एका बोगीचे कुलूप तोडून त्यातील गव्हाचे पोते लुटले.

घटनेची माहिती समजताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली व चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पैशाची चणचण जाणवू लागल्याने काहींची या संधीचा फायदा उठवत ही लूट केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...