बेलपिंपळगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात गावातील किमान 50 ठिकाणी लाईट ची पोल पडले असून अनेक झाडे पडली. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर 6 ठिकाणी झाडे पडली असून गावाचा संपर्क तुटला आहे. गावात येणारे सर्व रस्त्यावर झाड पडल्याने गावात कोणी बाहेरून येऊ शकत नाही.
शेतात उभी पिके भुईसपाट झाली. कांद्यात पाणीच पाणी झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक घरांची पत्रे उडाली तर अनेक घरावर झाड पडली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.




