Friday, July 3, 2026
HomeUncategorizedसुबोध भावे साकारणार शरद पवार ?

सुबोध भावे साकारणार शरद पवार ?

मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायची इच्छा बोलून दाखवली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुबोध भावेने शरद पवारांची भेट घेतली. सातत्याने व्यक्त होणार्‍या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल, असं तो म्हणाला.

सुबोधने आतापर्यंत लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांचे बायोपिक केले. सुबोधने याआधीही पवारांची भूमिका साकारायची इच्छा व्यक्त केली होती. मनात काय चाललंय हे तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार 55 वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढं बघितलंय तेवढं आज राजकारणात कोणीच पाहिलेलं नाही, असं तो म्हणाला होता. त्यामुळे आगामी काळात शरद पवारांच्या जीवनावर आधारित बायोपिक आल्यास त्यांच्या भूमिकेत सुबोध भावेला पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...