Saturday, July 4, 2026
Homeदेश विदेशसोनिया गांधी यांच्या विनंतीवरून माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा राज्यसभा लढवणार

सोनिया गांधी यांच्या विनंतीवरून माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा राज्यसभा लढवणार

दिल्ली – माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलर सर्वेसर्वा एचडी देवेगौडा यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे आमदार, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अन्य नेत्यांच्या विनंतीवरून राज्यसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली आहे. तसेच ते उद्या म्हणजे मंगळवारी आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

यावर कर्नाटकचे माजी मंत्री डी के शिवकुमार या वर प्रतिक्रिया देताना म्हणाले, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून कोणत्याही तिसर्‍या भाजप उमेदवारास राज्यसभेची निवडणूक जिंकू द्यायची नाही. या बाबत आमच्या नेत्या सोनिया गांधी या नक्की विचार करतील. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Union Cabinet Expansion : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता;...

0
नवी दिल्ली | New Delhi उत्तरप्रदेश, पंजाबसह आणखी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet Expansion) मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप...