Saturday, July 4, 2026
Homeनगरश्रीगोंदा – येळपणेचे ग्रामदैवत खंडेश्वर मंदिरात चोरी

श्रीगोंदा – येळपणेचे ग्रामदैवत खंडेश्वर मंदिरात चोरी

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील येळपणे गावातील  ग्रामदैवत खंडेश्वर मंदिरातील सुमारे दोन लाख किमंतीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. गावकऱ्यांना माहिती समजताच घटनास्थळी गावकरी जमा झाले.

खंडेश्वर महाराजांसाठी पाच किलो वजनाचा चांदीचा मुखवटा व दोन तोळे सोन्याचे दागिने केले होते. मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. खंडेश्वर महाराजांचा चांदीचा मुखवटा चोरीस गेला आहे. घटना स्थळी पोलिस अधिकारी, श्वान पथक व ठसे तज्ञ यासह उपविभागीय पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 210 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 449 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...