Friday, July 24, 2026
Homeमहाराष्ट्रCrime News : धक्कादायक! पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे न दिल्याने मुलानेच केली...

Crime News : धक्कादायक! पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे न दिल्याने मुलानेच केली बापाची हत्या

लातूर । Latur

पोलीस भरतीसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणाने आपल्या ७० वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ पांचाळ (वय ७०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर आरोपी मुलाचे नाव अजय पांचाळ (वय २४) आहे. अजय पोलीस भरतीची तयारी करत असून, त्याने आपल्या वडिलांकडे भरतीची फी भरण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, काशिनाथ पांचाळ यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून, गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

घरात गॅस सिलेंडर संपल्यामुळे काशिनाथ यांनी अजयला पैसे न देता, सिलेंडर खरेदी करण्यासाठी पत्नीला पैसे दिले. यावरून अजय संतापला आणि त्याने वडिलांना जाब विचारण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात अजयने लाकडी काठीने वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला. या गंभीर मारहाणीत काशिनाथ पांचाळ यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी जखमी काशिनाथ यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेनंतर चाकूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अजय पांचाळ याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. केवळ पैशांसाठी मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

एनटीएचे ४७ अधिकारी तडकाफडकी बडतर्फ

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर...