Thursday, May 2, 2024
Homeनाशिककॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कलतर्फे व्याख्यानमाला

कॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कलतर्फे व्याख्यानमाला

नाशिक । Nashik

नाशिक कॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कल नाशिक आयोजित आपली वसंत व्याख्यानमाला 2020 चे आयोजन गुरुवारी (दि.६) फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित करण्यात आले आहे.

- Advertisement -

सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा कायदा व सुव्यवस्था समाज प्रबोधन आदी विषयांना दिशादर्शक ठरणारी आपली वसंत व्याख्यान माला 2020 ही व्याख्यानमाला गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ‘ आठवणीतलं नाशिक ‘ या विषयावर गं.पा. माने माजी आयुक्त दारूबंदी खाते महाराष्ट्र शासन यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवारी(दि.७)नाशिककर सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीर यांचे ‘ प्रदूषणमुक्तगोदा ‘या विषयावर सायंकाळी ५ वाजता व्याख्यान होणार आहे.

या व्याख्यानमालेचा फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजन करण्यात आले असून सर्व नाशिककर नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कल नाशिक संस्थापक अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर , राहुल पगारे , रमाकांत तरोडे, मुन्ना ठाकूर, ज्ञानेश्वर चव्हाण, भूषण भावसार आदींनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या