कर्जत |प्रतिनिधी| karjat
करोना उपचारांसाठी घेतलेल्या 40 हजार रूपयांना 20 टक्के दराने व्याज आकारून मुद्दल आणि त्या मुद्दलीचे 96 हजार व्याज अशी 1 लाख 36 हजार रक्कम वुसल करण्यासाठी छळ करणार्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथील सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन माने (रा. भंबोरा, ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. या प्रकरणी बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुरेंद्र रविंद्र काजळे यांनी तक्रार दिली आहे. ते व त्यांची पत्नीला डिसेंबर 2020 रोजी कोरोना संसर्ग झाला होता. उपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी सचिन माने यांच्याकडून 40 हजार रुपये व्याजानेे घेतले होते.
16 हजार व्याज दिले असतानाही 31 मार्च 2021 माने याने काजळे यांची रॉयल इन्फील्ड क्लासिक बुलेट (एम.एच 42 ए व्ही 6009) ही गाडी हिसकावून घेतली. 40 हजार रक्कम व त्यावर आत्तापर्यंत झालेले 96 हजार व्याज असे एकुण 1 लाख 36 हजार दे असे म्हणत माणसीक त्रास दिला. यामुळे काजळे यांनी अखेरीस पोलीसांत तक्रार दाखल केली.