Monday, September 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला; दोन जण जखमी

दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला; दोन जण जखमी

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी उमराळे रस्त्यावर नीलकमल फॅक्टरी जवळ जांबुटके शिवारात दुचाकीवरील दोघांना बिबट्याने जखमी केले आहे

दिंडोरी तालुक्यातील जांबुटके परिसरात आणि दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे जांबुटके मडकीजंब निळवंडी दिंडोरी परिसरात बिबट्या कायम फिरत राहतो आज संध्याकाळी जांभुळ खेळतील जांबुटके येथील शेतकरी चेतन दत्तू कराटे वय 25 व पवन सुरेश कराटे वय २४ वर्षे हे मोटरसायकलने चालले असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली त्यात दोघेजण जखमी झाले दोघांनाही दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनुष्का गिरासे यांनी त्यांच्यावर उपचार केले . चेतन कराटे याच्या पायाला पायाला व मांडीला बिबट्याने चावा घेतल्याने जखम झाली आहे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना नाशिकला अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर दुसरा युवक पवन सुरेश कराटे याला बिबट्याने नख मारले असून त्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आली आहे

.बिबट्याने हल्ला केल्यानंतर पळ काढला .शेतकऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग केला परंतु बिबट्या सापडला नाही. नागरिकांनी सावधान राहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील आक्रमक; १२ तारखेला अंतरवालीत निर्णायक बैठक,...

0
जालना । Jalna मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने पुन्हा एकदा निर्णायक टप्पा गाठला असून, आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप करत...