Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगोंदे शिवारात बिबट्या जेरबंद

गोंदे शिवारात बिबट्या जेरबंद

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

- Advertisement -

तालुक्यातील गोंदे शिवारातील काटवण मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारी मादी बिबट्या जेरबंद करण्यात आज (दि.7) पहाटेच्या सुमारास वनविभागाला यश आले.

बिबट्यांच्या वावरामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होते. परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या मका शेतीमुळे बिबट्यांसाठी आश्रय मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांची दररोजची शेतीकामं धोक्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून गस्त घालून बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या पथकाने शेतकरी गणेश भीमा तांबे यांच्या शेत गट नंबर ६९२ मध्ये पिंजरा लावला होता.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पहाटे अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपाल प्रितेश सरोदे,वनरक्षक रूपावली गायकवाड, रोहित लोणारे, निखिल वैद्य, वसंत आव्हाड यांनी यासाठी परिश्रम घेतले. वनसेवकांनी बिबट्याला मोहदरी येथील वन उद्यानात हलवले आहे. वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळण्याचं तसेच शेतीकाम करताना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लोंढे टोळीच्या जामिनांची मालिका! ‘बॉस’ची ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सातपूरमधील गोळीबार प्रकरणातून (Satpur Firing Case) चर्चेत आलेल्या लोंढे टोळीच्या (Londhe Gang) न्यायालयीन लढाईला आता वेग आला आहे. टोळीचा म्होरक्या...