Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Weather Update : पाऊस पुन्हा परतला! राज्यातील दहा जिल्ह्यांना IMD कडून...

Maharashtra Weather Update : पाऊस पुन्हा परतला! राज्यातील दहा जिल्ह्यांना IMD कडून ‘यलो अलर्ट’; कुठे बरसणार?

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्टोबर हिटचा (October Hit) चटका चांगलाच जाणवत आहे. यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकसह महाराष्ट्रातील (Maharashtra) इतर जिल्ह्यांत उकाडा वाढल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, अशातच आता दिलासादायक बातमी समोर आली असून, माघारी फिरलेला पाऊस (Rain) राज्यात पुन्हा एकदा कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

- Advertisement -

IMD कडून यलो अलर्ट जारी

राज्यातील कोल्हापूर, चिपळूण, धुळे, सांगलीसह इतर भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना (Citizen) हवामानामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाकडून राज्यातील दहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा घाट, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वि‍जांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

तर उद्या (सोमवारी)राज्यातील तुरळक ठिकाणी वि‍जांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशीव, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने काय म्हटले?

हवामान विभागाने ( Meteorological Department) उत्तर भारत आणि डोंगराळ प्रदेशातील अनेक भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या उर्वरित सर्व भागांतून तसेच गोवा, कर्नाटक, तेलंगणा व ओडिशाच्या काही भागांतून आणि झारखंड व छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून मागे फिरला असल्याचे हवामान विभागाने अधिकृतपणे जाहीर केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : लोंढे टोळीच्या जामिनांची मालिका! ‘बॉस’ची ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सातपूरमधील गोळीबार प्रकरणातून (Satpur Firing Case) चर्चेत आलेल्या लोंढे टोळीच्या (Londhe Gang) न्यायालयीन लढाईला आता वेग आला आहे. टोळीचा म्होरक्या...