Wednesday, January 15, 2025
HomeनाशिकNandgaon : दहेगाव शिवारात बिबट्याचे दर्शन

Nandgaon : दहेगाव शिवारात बिबट्याचे दर्शन

वनविभागा कडून बिबट्याची शोध मोहीम सुरु

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव  तालुक्यातील  दहेगाव येथील अशोक शिंदे यांच्या तुरीच्या पिकात दोघा शेतकऱ्यांना मंगळवारी सकाळी  बिबट्या मुक्त संचार करत असताना दिसला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

नांदगांव तालुक्यात यावर्षी वरुण राजाने समाधानकारक बरसात केली असल्याने सध्या शेतात  मका, तुरीचे पीक घनदाट आहे तसेच या परिसरात मेंढ्यापाळ मेंढ्या चारत असतात शिकारीच्या शोधत येथे बिबट्याचा वावर दिसून येत आहे दहेगाव येथीलअशोक शिंदे यांच्या तुरीच्या पिकात दोघा शेतकऱ्यांना मंगळवारी सकाळी दिवसा  बिबट्या मुक्त संचारकरत असताना आढळून आला. तुरीच्या पिकात बिबट्या मादी जातीची असून ती आपल्या पिला सोबत आहे अशी शंका व्यक्त केली जात आहे.

यासंबंधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी आले व त्यांनी बिबट्याचे ठसे व अक्षांश-रेखांशमध्ये फोटो घेतले.तसेच या ठिकाणी आढळून आलेलेले पावलांच्या ठसे ही बिबट्याचे असल्याचे येथील  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री केली आहे.

वनविभागाच्या  पथकाने दिवसभर तुरीच्या शेताच्या बाजूला शोधमोहीम राबविण्यात येऊन येथे चार ही बाजूने पिंजरा लावण्यात आला आहे. या परिसरात 
बिबट्याच्या भितीने परिसरात  शेतकरी, मजुरांनी  आज सकाळपासून कामे बंद केली आहेत. या परिसरात बिबट्या दर्शन  दिल्याने  शेतात राहत असलेल्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या