Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik : रामवाडी पुलानजीक बिबट्याचे दर्शन

Nashik : रामवाडी पुलानजीक बिबट्याचे दर्शन

नागरी वस्तीत भीतीचे वातावरण



पंचवटी । प्रतिनिधी Panchavati


शहरालगतच्या म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद परिसरात बिबट्याचा वावर नेहमीच पाहायला मिळतो. आता रामवाडी पुलानजीक असलेल्या बेलेश्वर महादेव मंदिर परिसरात बिबट्या मुक्तपणे फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नागरी वस्तीत दिसलेल्या या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -


बिबट्या मंदिराजवळून नागरी वस्तीकडे जाताना स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः या मार्गाने शाळकरी मुले, नागरिक आणि विद्यार्थी दररोज शॉर्टकटने ये-जा करत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.रामवाडी परिसरात बिबट्याचे हे पहिलेच दर्शन नाही.

Screenshot

काही दिवसांपूर्वी हनुमानवाडी येथील बेंडकुळे मळ्यात देखील बिबट्याचा वावर पाहायला मिळाला होता. याच भागातील एका गोठ्यातून बिबट्याने वासरालाही फरफटत नेत ठार केले होते. आता पुन्हा रामवाडी पुलाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे.सीसीटीव्ही फुटेजनुसार, बिबट्या हरी बेंडकुळे यांच्या गोठ्याजवळही दिसल्याचे समजते.

वन विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वेळेवर उपाययोजना न झाल्यास एखादा गंभीर प्रसंग घडू शकतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


ताज्या बातम्या

Nashik Crime News : दप्तर फेकून विद्यार्थ्याला शिक्षा; बाल न्याय कायद्यांतर्गत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अभ्यास करताना क्लासमध्ये खोडकरपणा केल्याने विद्यार्थ्याला (Student) शिक्षा देणे आणि त्या शिक्षेचा अतिरेक करून त्याला मानसिक अथवा शारीरिक त्रास देणे,...