Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBala Nandgaokar: 'जीवनात ही घडी अशीच राहू दे'…; बाळा नांदगावकर तो फोटो...

Bala Nandgaokar: ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’…; बाळा नांदगावकर तो फोटो शेअर करत म्हणाले…

मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल शनिवारी २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. एकमेकांना त्यांनी प्रेमादराने जवळ घेतले तेव्हा सभागृहात अभूतपूर्व जल्लोष झाला. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. ज्या मराठी मेळाव्यामध्ये त्यांनी एकीची वज्रमूठ दाखवून दिली तीच एकीची वज्रमूठ या महाराष्ट्रामध्ये कायम राहावी आणि दोन बंधूंनी एकत्रितपणे आगामी निवडणुकींचा आणि राजकीय आव्हानांचा मुकाबला करावा अशीच प्रतिक्रिया अवघ्या महाराष्ट्रातून येत आहे.

बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मराठी माणसाची एकजूट ठेवा, असे राज ठाकरे म्हणाले, तेव्हाही सभागृह दणाणून गेले. कायमचे एकत्र येण्यासाठीचे स्पष्ट संकेत मिळाले, पण तशी घोषणा करण्यात आली नाही. यानंतर या मेळाव्याबाबत राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीकडून केल्या जाणाऱ्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

- Advertisement -

जेव्हा दोन बंधू एकत्रित भेटले तेव्हा अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. हा क्षण येऊ दे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक म्हणजे मनसे नेते बाळा नांदगावकर यांचाही समावेश आहे. त्यांनी अनेकवेळा बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेले अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. काल सुद्धा दोन भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांच्या भावना दाटून आल्या. यानंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि पांडुरंगाकडे एक मागणी केली आहे.

https://www.facebook.com/stories/172648417551623/UzpfSVNDOjE2NDA0MjM3NDA2NzkyMjU=/?view_single=1

जीवनात ही घडी अशीच राहू दे
दरम्यान, आज (6 जुलै) बाळा नांदगावकर यांनी फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याचसाठी केला होता अट्टाहास. गेली २ दशके ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो आज आला आणि कायमचा मनात घर करून गेला. बाळासाहेब आज जिथे असतील तिथून अतिशय आनंदाने बघत असतील. राजकीय इच्छा आणि महत्त्वाकांक्षा याच्या पलिकडे जाऊन मी हाच विचार घेऊन वाटचाल करत राहिलो की ठाकरे एकत्र दिसावे आणि आज मी याची देहा याची डोळा हे बघून सगळ्यात आनंदी झालो. त्यात आषाढीसारखा अतिशय पवित्र दिवशी हा आनंद द्विगुणित झाला आहे. आता पांडुरंगाकडे एकच मागणे आहे जीवनात ही घडी अशीच राहू दे, असे बाळा नांदगावकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाचा अपघात; सर्वजण सुखरूप

0
मुंबई |खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याची...