Thursday, November 19, 2026
HomeनाशिकNashik TCS Case: माजी खासदार इम्तियाज जलील यांना दिलासा; नाशिक न्यायालयाकडून जामीन...

Nashik TCS Case: माजी खासदार इम्तियाज जलील यांना दिलासा; नाशिक न्यायालयाकडून जामीन मंजूर

नाशिक | Nashik
राज्यभर गाजत असलेल्या नाशिकमधील TCS धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक छळ (Nashik TCS Sexual Harresment Case) प्रकरणात एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील (MIM Leader Imtiaz Jaleel) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला (Nashik District Court Grants Bail). ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला आहे. या अर्जावर जवळपास अडीच तास सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाने जलील यांच्या जामिनाला तीव्र विरोध केला. मात्र, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि तपास यंत्रणेची भूमिका ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला.

अडीच तासांच्या सुनावणीनंतर जामीन मंजूर
इम्तियाज जलील गुरुवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले होते. निदा खान हिला फरार असताना आश्रय दिल्याच्या आरोपावरून त्यांचा या प्रकरणातील सहआरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सविस्तर सुनावणी झाली. सरकारी पक्षाने तपासातील पुरावे आणि आरोपांचा दाखला देत जामिनाला विरोध केला. विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासाची माहितीही न्यायालयासमोर मांडण्यात आली. जलील यांच्या वतीनेही जामीन मंजूर करण्यासंदर्भात युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.

- Advertisement -

टीसीएस प्रकरणः हॉटेल्स, अन् वकालतनाम्याचे गूढ; माजी खासदार जलील यांची आज न्यायालयात हजेरी

निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप
नाशिकमधील TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्नांशी संबंधित प्रकरणात निदा एजाज खान ही प्रमुख संशयितांपैकी एक आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती. तपासादरम्यान निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध हॉटेल्स, खोल्या आणि स्वतंत्र घरांमध्ये आश्रय दिल्याचा आरोप समोर आला. या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. या दोघांच्या चौकशीतून इम्तियाज जलील यांचे नाव तपासात समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर जलील यांचाही या प्रकरणात सहआरोपी म्हणून समावेश करण्यात आला.

इम्तियाज जलील काय म्हणाले?
कोणत्याही आरोपीला कायदेशिर कारवाईसंदर्भात मदत करणं हा काही गुन्हा नाही होतं. बघा हे प्रकरण असं नाही की पोलिसांनी माझा त्यामध्ये काय रोल होता, हे शोधलं. ते त्यांनी त्यांच्या तपासामध्ये आणलं. खरंतर मी माझ्या सभेमध्ये सांगितलं होतं की, मी त्या प्रकरणाबद्दल जे जे अभ्यासलं. त्या मुलीला (निदा) भेटलो आणि जेव्हा तिने मला सांगितलं की सगळं प्रकरण काय होतं. तिचं म्हणणं होतं की तिचा काहीही रोल नव्हता. तर त्यावर मी काय म्हणलं होतं की, तू जर जे बोलतेय ते खरं असेल तर नक्की आम्ही तुमच्यासोबत उभे राहणार, आणि सोबत उभे राहणार म्हणजे, तुला वाचवण्यासाठी आम्ही काहीही करु शकत नाही, तुला वाचवण्यासाठी फक्त कायदेशिर सल्ला देऊ शकतो. कारण तिची कौटुंबिक पार्श्वभूमी तेवढी काही मजबुत नव्हती. त्यामुळे हा काही गुन्हा नाही होऊ शकतं, असं जलीलांनी यावेळी सांगितलं.

जर कायदेशिर गोष्टींमध्ये कोणाला काही सल्ला देणं जर गुन्हा असेल तर सर्व वकिलांना जेल व्हायला पाहिजे, असंही यावेळी जलीलांनी सांगितलं. तिला न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

केमीकलयुक्त

Nashik News: केमीकलयुक्त पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास; कारवाई...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधीअंबड औद्योगिक (Ambad MIDC) वसाहतीलगत असलेल्या दत्तनगर (Datta Nagar) परिसरातील मारुती संकुल येथील नैसर्गिक नाल्यात काही कंपन्यांकडून रसायनयुक्त पाणी(Non Treated Chemical...