Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

केंद्रीय मंत्री नगरपालिका प्रचाराच्या मैदानात, गडकरी, गोयल यांचा समावेश

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बुधवारी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिव प्रकाश, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा समावेश आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण तसेच अल्पसंख्याक समाजातील इद्रिस मुलतानी यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, आशीष शेलार, राधाकृष्ण विखे- पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर, अतुल सावे, अशोक उईके यांचा समावेश आहे.

भाजपचे अन्य स्टार प्रचारक : सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, अमर साबळे, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. भागवत कराड, गोपीचंद पडळकर, संजय कुटे, अमित साटम, धनंजय महाडिक, माधवी नाईक, रणधीर सावरकर, अशोक नेते, मंगेश चव्हाण, प्रसाद लाड.

ताज्या बातम्या

Nashik News : सप्तशृंगगड-नांदुरी घाट रस्ता तीन दिवस वाहतुकीसाठी बंद; कारण...

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | Sapthshurngi Gad साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर जाणारा रस्ता (Road) तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....