Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला! युती की स्वबळावर?

महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला! युती की स्वबळावर?

मुंबई | Mumbai

राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या एकत्रित महायुती आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून निवडणुका या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असा दावा करण्यात येत आहे.

- Advertisement -

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Elections) महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. तर ठाणे महापालिका निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये, ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढता येईल का? याची चाचपणी होणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली आहे. विरोधकांना जिथं फायदा, तिथं महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील. मात्र, या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील, अशी रणनीती महायुतीने आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्यास मविआला व अन्य विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो. महायुतीच्या तीन पक्षांमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा मविआच्या उमेदवारांना होऊ शकतो. हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना याबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी मुंबईत महायुती एकत्र लढेल, असे संकेत दिले. मुंबई महानगरपालिका सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे शिवसेना आणि मनसे (MNS) पक्ष एकत्र आले आहेत. या दोघांचे आव्हान महायुती कशाप्रकारे परतवून लावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळेच महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. तर उर्वरित ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचे की वेगवेगळे लढायेच हे आम्ही ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान महाविकास आघाडीचा देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाहीये. तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत जाणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...