Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्याLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार! उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार...

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार! उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

दिल्ली । Delhi

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार आहे. दरम्यान, आदर्श आचारसंहिता निवडणकू घोषणा झाल्यानंतर लगेचच लागू होते, ती सुद्धा उद्याच होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल.

या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार तिसरी टर्म जिंकण्याची आशा करत आहे, तर विरोधक इंडिया आघाडीच्या अंतर्गत एनडीएमध्ये धक्का देण्याची आशा करत आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससारख्या पक्षांनी आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.

नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच निवडणूक आयोगानं ही घोषणा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुका (Loksabha Election) सात ते आठ टप्प्यांत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नवनियुक्त निवडणूक आयुक्तांच्या औपचारिक स्वागतानंतर पूर्ण आयोगाची बैठक झाली. ही बैठक जवळपास ४५ मिनिटे चालली. निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेने व्हाव्यात यासाठी संवेदनशील क्षेत्रांत आणि राज्यांमध्ये किती मनुष्यबळ तैनात करावे लागेल, याबाबतचा आढावा घेण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते. याव्यतिरिक्त किती टप्प्यांत निवडणूक कार्यक्रम घ्यायचा आहे? कोणत्या राज्यांत आधी आणि कोणत्या राज्यांत नंतर निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

२०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तारीख १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. गेल्या वेळी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी ६७.१ टक्के मतदान झाले होते. तर २३ मे रोजी मतमोजणी झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या