लोणी (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील लोणी येथे रविवारी श्रीरामपुरच्या फरदिन अबू कुरेशी या युवकावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. श्रीरामपुरचे तीन तर लोणीतील चार आरोपी या घटनेनंतर पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने त्यातील चार जणांना रात्री जेरबंद केले. त्यामध्ये संतोष कांबळे, सिराज शेख व शाहरुख शहा हे श्रीरामपूर येथील तर अरुण चौधरी या लोणी येथील आरोपींचा समावेश आहे, आणखी तीन आरोपींचा शोध सुरु आहे.
लोणीतील गोळीबार प्रकरणातील चार आरोपी जेरबंद
ताज्या बातम्या
Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...




