नाशिक | प्रतिनिधी
महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सकाळी पार पडली असून भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी स्थायी समिती सभागृहात विशेष बैठक पार पडली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, सभापतिपदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे वरकरणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत दिसत असली तरी संख्याबळाच्या गणितात महायुतीचे पारडे जड होते. भाजपसाठी ही निवडणुक केवळ औपचारिकता म्हणून पाहिले जात होते. दुसरीकडे मुकेश शहाणे यांनी ऐन वेळी माघार घेतल्यामुळे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व असून, समितीतील १६ सदस्यांपैकी ९ सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. सोबतच शिवसेना शिंदे गट भाजपसोबत सत्तेत असून, त्यांच्याकडे चार सदस्य आहेत. त्यामुळे भाजपकडे सद्यस्थितीत १६ पैकी १३ सदस्यांचे पाठबळ आहे. राष्ट्रवादीचा एकमेव सदस्य असून, राष्ट्रवादीही भाजपसोबतच राहणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष महापालिकेतील सत्तेतील घटक पक्ष असल्याने सत्तापदांच्या वाटप सूत्रानुसार भाजपच्या उमेदवाराला या पक्षांचा पाठिंबा असणार हे उघड आहे. त्यामुळे सभापतिपदी सानप यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
Crime News: पंधरा हजारांची लाच घेताना सरपंचासह पतीला अटक
महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना सानप यांना भाजपकडून उपमहापौरपदासाठीची उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, ऐनवेळी शिवसेना शिंदे गट सत्तेत आल्याने उपमहापौरपद शिंदे गटाला द्यावे लागले होते. त्यामुळे सानप यांना उपमहापौरपदापासून वंचित रहावे लागले होते. पंरतु, माघारीचे बक्षीस म्हणून आता त्यांना थेट स्थायी समिती सभापतिपदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सानपांसाठी माघारीचा निर्णय लाभदायी ठरला आहे.





