Sunday, May 3, 2026
Homeदेश विदेशMake In India: भारताच्या हवाई सामर्थ्यात होणार वाढ; राफेलचे भाग भारतातच तयार...

Make In India: भारताच्या हवाई सामर्थ्यात होणार वाढ; राफेलचे भाग भारतातच तयार होणार, डसॉल्ट-टाटामध्ये करार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानची खोड मोडल्यानंतर आता भारतीय संरक्षण दलांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारताने संरक्षण दलाचे बजेट वाढवल्यानंतर आता फ्रान्सचे राफेल लढाऊ विमानाची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.

हैदराबादमध्ये अत्याधुनिक प्लांटची निर्मिती
फ्रान्सच्या बाहेर राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज (मुख्य ढाचा) तयार करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (TASL) यांच्यात करार झाले आहेत. यासाठी टाटा कंपनी हैदराबादमध्ये एक अत्याधुनिक प्लांट उभे करणार आहे. राफेलचा पहिला मुख्य भाग आर्थिक वर्ष २०२८ मध्ये तयार होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे उत्पादन भारतीय तसेच जागतिक बाजारपेठांसाठी केले जाणार असून यामुळे सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला चालना मिळणार आहे. तर देशाची संरक्षण स्वयंपूर्णतेकडे वाटचालही अधिक वेगाने होणार आहे. त्यासोबतच भारताच्या एअरोस्पेस उत्पादन क्षमता मजबूत करणे आणि जागतिक पुरवठा साखळीला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल असणार आहे.

करारामुळे राफेलला चांगला फायदा होणार
डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी या कराराबाबत सांगितले की, आम्ही भारताला राफेल पुरवतो, मात्र आता भारतातच राफेलचा काही भाग तयार होणार आहे. भारतीय एरोस्पेस उद्योगातील महत्वाची कंपनी असलेल्या टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टमसोबतच्या करारामुळे राफेलला चांगला फायदा होणार आहे.

संपूर्ण फ्युझलाज तयार होणार
हैदराबाद येथील या प्रकल्पात राफेल लढाऊ विमानाचे पुढचे भाग, मध्यभाग, मागचा भाग आणि साइड शेल्स यांचा समावेश असलेले संपूर्ण फ्युझलाज तयार केले जातील. वित्तीय वर्ष 2028 पासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि दरमहा दोन पूर्ण फ्युझलाज तयार करण्याची क्षमता या केंद्राकडे असेल. ज्याच्या माध्यमातून देशाच्या एअरोस्पेस उत्पादन क्षमता मजबूत करणे आणि जागतिक पुरवठा साखळ्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. ही सुविधा भारताच्या एअरोस्पेस पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या महत्त्वाची गुंतवणुक दाखवून देते आणि हाय-पर्सिजन मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करेल, असे दसॉल्ट आणि टीओएसएसने एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

आघाडीचे ट्विन-जेट लढाऊ विमान
राफेल हे जगातील एक आघाडीचे ट्विन-जेट लढाऊ विमान आहे. हे विमान विमानवाहू नौकांवरूनही उड्डाण करु शकते. राफेलमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. यात हवाई हल्ला करण्याची क्षमता आहे, तसेच या विमानावर झालेला जमीनीवरून झालेला हल्ला परतून लावण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे या लढाऊ विमानाला जगभरातून मोठी मागणी आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Delhi AC Blast : दिल्लीत अग्नितांडव; एसी नऊ जणांच्या जिवावर बेतला!

0
नवी दिल्ली | New Delhi सध्या देशभरात उष्णतेने (Heat) कहर केला आहे. दिवसांदिवस तापमान वाढत असल्याने या उकाड्यापासुन बचाव करण्यासाठी अनेक घरांमध्ये पंखा किंवा एसी...